You are currently viewing कुडाळ तालुक्यातील अल्पसंख्याकांच्या मूलभूत,पायभूत सुविधांसाठी १ कोटी ३५ लाख रु.निधी मंजूर

कुडाळ तालुक्यातील अल्पसंख्याकांच्या मूलभूत,पायभूत सुविधांसाठी १ कोटी ३५ लाख रु.निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,ना. नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्र विकास योजना २०२१-२२ अंतर्गत कुडाळ तालुक्यासाठी १ कोटी ३५ लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत /पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आ. वैभव नाईक यांनी सुचविलेल्या विकास कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ३१ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
यामध्ये कुडाळ तालुक्यातील अल्पसंख्याक वस्तीमध्ये विविध विकास कामांसाठी निधी ५० लाख रु,माणगाव चर्च येथे सभामंडप बांधणे व विकास कामे करणे निधी २० लाख, पिंगुळी भूपकरवाडी ते स्मशानभूमी ते मदरसाकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख रु., पिंगुळी भूपकरवाडी ते मुस्लिमवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख रु., आंब्रड भटवाडी भटवाडी ते मुसलमान वाडी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख रु., आंब्रड मुसलमान वाडी मस्जिद पासून मुजावर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख रु., घोटगे येथील वेलांकणी चर्च समोर कंपाउंड वॉल बांधणे व परिसरात विकास कामे करणे व सभामंडप बांधणे निधी १५ लाख रु. कडावल गावातील होलिस्प्रीट चर्च येथे सभामंडप बांधणे निधी १० लाख रु ही कामे मंजूर करण्यात आलीआहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा