भालचंद्र चषक २०२६ कबड्डी स्पर्धेला कणकवलीत उत्स्फूर्त प्रारंभ
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन; कबड्डीप्रेमींची मोठी उपस्थिती
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन व कणकवली तालुका कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘भालचंद्र चषक २०२६’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला कणकवली येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक स्वप्नील राणे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, अमोल रासम, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, बंटी तहसीलदार, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, रूपेश परब, रुचिर ठाकूर, अभी चव्हाण, संदेश आर्डेकर, नंदू वाळके, भैया आळवे, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, ओमकार हळदिवे, समीर कमलापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असल्याने विविध भागातील संघांनी सहभाग घेतला असून, स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली. मैदानावर खेळाडूंच्या दमदार चढाया आणि पकडींमुळे कबड्डीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर व हरेश सावंत यांनी केले. यंगस्टार मित्रमंडळाच्या या आयोजनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
