You are currently viewing जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत यांसोबत अरविंद मोंडकर यांनी घेतली यशोमती ठाकूर यांची भेट

जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत यांसोबत अरविंद मोंडकर यांनी घेतली यशोमती ठाकूर यांची भेट

महिला आयोगाची विभागीय कार्यालये कार्यान्वित केल्या बद्दल महिला व बालविकास मंत्री यशोमती ताई ठाकूर यांचे युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी मानले आभार..

राज्य महिला आयोगाची विभागस्तरीय सहा कार्यालये जागतिक महिला दिनी कार्यान्वित करण्यात आली असून
महिला व बालविकासा साठी हिरिरीने प्रयत्न करत चांगले निर्णय घेत असल्याने मुंबई येथे शासकीय निवासस्थानी जाऊन मंत्री यशोमती ठाकूर यांचे आभार मानले

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महिंद्र सावंत, युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, रुषाल पाटील व इतर उपस्थित होते

अत्याचारपीडित महिलांना, मुलींना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी याहेतूने राज्य महिला आयोगाची कार्यालये राज्यातील सगळ्या विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत अशी संकल्पना काही दिवसांपूर्वी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार आघाडी सरकारने नुकताच शासन निर्णय जारी केला. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात आली आहेत.

अत्याचारपीडित महिलांना महिला आयोगाकडे दाद मागायची असेल तर मुंबईत जावं लागतं ते कधी त्यांना परवडणार देखील नसत म्हणू या महिलांना संपर्क साधणे कठीण जाऊ नये. विभागीय कार्यालये सुरू होत असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील समस्या घेऊन आलेल्या महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातून सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.

अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगाने स्वाधिकारे (सु-मोटो) दखल घेण्यासारख्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना मंत्री महोदयांच्या वतीने देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मत्स्य विक्रेत्या महिला यांचे काही प्रश्न अरविंद मोंडकर यांनी मांडले या प्रश्नांवर चर्चा करताना लवकरच मी स्वतः जिल्ह्यात येऊन संबंधित अधिकारी यांची जिल्हाधिकारी सोबत बैठक लावून त्यावर मार्ग काढू असे मंत्री महोदयांनी सांगितले..

 

प्रतिक्रिया व्यक्त करा