You are currently viewing भाजयुमोच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे यांची नियुक्ती
Oplus_16908288

भाजयुमोच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी विनेश तावडे यांची नियुक्ती

जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या हस्ते नियुक्ती, भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सावंतवाडी / प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या आंबोली मंडळ अध्यक्षपदी माडखोल येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते विनेश तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षासाठी त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याची दखल घेत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा चिटणीस जावेद खतीब, श्री पुजारे, जयेश चिंचाळकर, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारी, जावेद खान, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश विठ्ठलकर, राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक तथा जिल्हा चिटणीस निलेश हरी चव्हाण, बाबुल शेटकर, कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रकाश सावंत, प्रसाद पाटकर, निमंत्रित तानाजी काशिनाथ गायतोंडे, कुडाळचे माजी युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, ओंकार कोरगावकर, मयूर राणे, विनय सावंत, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, पारस कांबळे, सागर चव्हाण, शुभम परब, समीर सावंत, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल गावडे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी, बांदा पक्ष युवा अध्यक्ष सिद्धेश कोचरेकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या निवडीबद्दल विनेश तावडे यांचे भाजप कार्यालयात युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, संदीप गावडे, नेमळेचे माजी सरपंच विनोद राऊळ, गेळेचे सरपंच सागर ठोकरे, संकेत राऊळ, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, हितेन नाईक, अभिजीत धुरी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा