You are currently viewing लोक चळवळीचे नवे पर्व – अभिजीत दिपके

लोक चळवळीचे नवे पर्व – अभिजीत दिपके

लोक चळवळीचे नवे पर्व – अभिजीत दिपके

महाराष्ट्रात २०१९ साली केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी जनतेत राजकीय असंतोष वाढवला. मग राज्यात पहिले राजकीय महानाट्य घडले. त्यानंतर काही राजकीय खलबतं होऊन २०२२ साली नवीन समिकरण जुळवतं महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठे महानाट्य घडले. त्यातून कोर्टचे दार उघडले आणि मग कायमच उघडे राहिले. हे पहून सर्वांना तारीख पे तारीख हा अभिनेता सनी देओलचा जग प्रसिद्ध चित्रपट संवाद आठवला. लोक न्युज चॅनेलवर म्हणू लागले आता भारतात पुन्हा राजकीय बदल होणार नाही. कारण भारतीय जनता शांत शांत मंद मंद आहे. कुठेही लोक आंदोलनाची शक्यता नाही. कुठलाही माणूस “मी आण्णा आहे” अशी टोपी घालत नाही. ही भावना सर्वांच्या मनात होती.

ही निराशा मनात ठेऊन चार वर्ष हा महाराष्ट्र जगत होता परंतु महाराष्ट्राची सर्वसामान्य राजकीय भुमिका मरुन पडली होती. सर्व मतदार सत्ताधारी पक्षालाच जास्त मत देत होते. संपूर्ण भारतातही हेच चित्र होते. त्यामुळे जानकर नागरिकांचे राजकीय जीवन संपले होते. अशावेळी अचानक एका घटनेवर टिप्पणी देताना सरन्यायाधीश सूर्यकांत सहज म्हणाले हल्लीचे युवक झुरळं आहेत. हा शब्द ऐकल्यावर अमेरिकेत शिकत असलेला अभिजीत दिपके या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “कॉक्रोज जनता पार्टी” ही चळवळ उभी केली. करोडो युवक, युवतींनी या चळवळीला पाठिंबा दिला. ही चळवळ फक्त सोशल मीडियाची आहे. ती हवा कालांतराने निघून जाईल, असे देशातील बहुसंख्य नागरिकांना वाटले होते. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी देखील या “कॉक्रोज जनता पार्टी” कडे जास्त लक्ष दिले नाही परंतु पुढे जाऊन या “कॉक्रोज जनता पार्टी” ने दिल्लीच्या जंतरमंतर या मैदानावर येऊन मोठे जनांदोलन उभे केले. २४ जून २०२६ ला देशभरातील युवानी शांततामय आंदोलन करून, राजधानी दिल्लीला गदागदा हलवण्याचा प्रयत्न केला. त्यातच उपोषण करणाऱ्या “सोनम वांगचुक” यांना केंद्र सरकारने उचलून रुग्णालयात नेले. कारण सोनम वांगचुक उपोषण सोडायला तयार नव्हते. अखेर डॉक्टरांच्या टीमने त्यांना इच्छा नसताना ओढून नेले. या घटनेचा परिणाम म्हणून आंदोलन जास्त मोठे झाले. अभिजीत दिपके या तरुणानी मग स्वतःहून उपोषण सुरू केले. त्यातून त्याने जनांदोलनाला धारधार केले. या रस्त्यावरच्या चळवळीला युवक, युवतीनी आणि त्यांच्या पालकांनी दणदणीत पाठिंबा दिला. -NEET- परीक्षेच्या घोटाळ्यामुळे २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे युवक, युवतींचा जनप्रक्षोप वाढला तो जनप्रक्षोप शांततामय आंदोलनातून समोर आला. या आंदोलनाला शेवटी शेवटी दडपण्याचा प्रयत्न केला गेला. शांततेत आंदोलन करणाऱ्या युवक, युवतींना दिल्ली पोलिसांनी छळ छळ छळले. या आंदोलनात नेमके काय झाले, हे आपल्याला सांगायची गरज नाही. कारण हे आंदोलन आपल्या समोर सुरू होते. शेवटी भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने मंजूर केला. युवांच्या चार-पाच मागण्याही सरकारने मान्य करत त्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन सरकारने दिले.

देशभरातील विरोधी पक्षांनी व समाजसेवी कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी या आंदोलनाला भरगोस पाठिंबा दिला. या जनशक्तीच्या रेट्याने युवा आंदोलनाला मोठे नैतिक बळ मिळाले. देशातल्या प्रत्येक राज्यात, शहरात, गावात आंदोलन, रॅली, उपोषण, तिरंगा प्रभात फेरी या सर्व गोष्टी सुरु झाल्या. हे सर्व झाल्यानंतर एक महिन्याने या आंदोलनाचा विजय झाला. केंद्र सरकार युवक, युवतींच्या समोर झुकले. एवढा मार खाऊन, हातपाय तोडून सुद्धा भारतीय युवाशक्ती मागे हाटली नाही. त्यांनी श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या देशांप्रमाणे आक्रमक, हिंसक आंदोलन केले नाही. भारत सरकारच्या धोरणात, काही बदल घडावेत असे या युवांना वाटत होते. हे या जनांदोलनाचे विशेष आहे.

महात्मा गांधींनी आपल्या देशाला जनांदोलनातून स्वातंत्र्य दिले. यानंतर महात्मा गांधीजींची हत्या झाली. असे झाले असले तरीही महात्मा गांधींचे विचार जिवंत राहिले. म्हणून आज सव्वाशे वर्षानंतर अभिजीत दिपके नावाच्या महात्मा गांधी विचाराने पाय रवून उभ राहण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याच्या या आंदोलनाने आज उच्च शिक्षणाचे स्वरूप बदलणार आहे. शिक्षण क्षेत्रात होणारे भ्रष्टाचार, घोटाळे मागे पडून याचा पुढे सकारात्मक निकाल लागणार आहे.

अभिजीत दिपके या तरुणाने पुण्यात पत्रकारितेची पदवी मिळवली. मग तो पदव्युत्तर पदवी मिळवण्या करता अमेरिकेत बोस्टन युनिव्हर्सिटीत गेला. तिथे त्याने “पब्लिक रिलेशन” या विषयात पदवी मिळवली. ती पदवी मिळवल्यानंतर अभिजीत टिपकेला अमेरिकेत चांगल्या जॉबच्या ऑफरस मिळत होत्या. अभिजीतने मात्र भारतात येण्याचा निर्णय घेतला. कॉक्रोज हा शब्द त्याला शांत बसू देत नव्हता. या शब्दातूनच त्याने “कॉक्रोज जनता पार्टी” नावाची चळवळ उभी केली. या चळवळीतून आपल्याला हे दिसून येते की, भारतात आजही महात्मा गांधींच्या प्रेरणेतून नेल्सन मंडेला तयार होत आहेत. नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेत लोकक्रांती घडवली होती. त्यामुळे भविष्यात भारतात आपल्याला युवाशक्तीमध्ये गांधीजींचे नेल्सन मंडेला दिसतील. म्हणूनच अभिजीत दिपके यांनी भारतात कल्याणकारी सुराज्याकरता आपले सामाजिक कार्य असेच सुरू ठेवावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून भारतीय राज्यघटना जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी या सदिच्छा युवांच्या पुढील वाटचालीकरता.

अॅड रुपेश पवार
9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा