You are currently viewing माऊली पालखीचे प्रस्थान

माऊली पालखीचे प्रस्थान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम गीतरचना*

 

*”माऊली पालखीचे प्रस्थान”* 

 

ज्ञानोबा पांडुरंग परमात्मा आहे संगम

प्रत्यक्ष वैकुंठ अवतरते आळंदीतIIधृII

 

आषाढीची चाहूल कळते कणाकणांत

चंद्रभागेच्या भेटीची ओढ जाण अलंकापुरीत

इंद्रायणी उचंबळते आसुशिनं येती स्पंदनII1II

 

साधकांच्या हृदयांत वारी बनते स्पंदन

पांडुरंगाच्या श्री चरणी अर्पण होण्याची ओढ

सजवलेली पालखी प्रस्थानासाठी होते सज्जII2II

 

मंदिराच्या बंद द्वाराआड चालतो पूजा पाठ

ठराविक पुजारी उतरतात गाभाऱ्यांत

अलवार भारावलेला प्रसंग होत निशब्दII3II

 

समाधीची प्रक्षाळ पूजा सुरू होते उष्णोदकानं

पत्री फुल सुगंधी द्रव्याने होत सुशोभित

खास चंदन थंड वाळ्याचे होते विलेपनII4II

 

साधा पोशाख नेसवतात वैराग्याची खूण

पुजारी माऊलींना आज्ञा मागती प्रस्थानार्थ

समाधीवरून ओघळते आशीर्वादे पुष्प पानII5II

 

डौलदार पालखीचे अश्व येतात सरकारांकडून

गांधी वाड्यात एक रात्र माऊली होत विश्रांत

माऊली अश्वारूढ होतं पालखीचे प्रस्थानII6II

 

©️काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा