You are currently viewing सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ग्राहक पुरस्कार तर विष्णूप्रसाद दळवी यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ग्राहक पुरस्कार तर विष्णूप्रसाद दळवी यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ग्राहक पुरस्कार तर विष्णूप्रसाद दळवी यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

पुणे येथील राज्य अधिवेशनात होणार पुरस्कार वितरण

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ग्राहक या पंचप्राण पुरस्कारासाठी कोकण विभागातून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तर उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे संघटक श्री. विष्णूप्रसाद दळवी यांना जाहीर झाला आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यात ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य केले जाते. प्रत्येक वर्षी संस्थेचे राज्य अधिवेशन आयोजित केले जाते. यावर्षी संस्थेचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ जि.पुणे येथे शनिवार दि. ८ व रविवार दि.९ ऑगस्ट,२०२६ रोजी आयोजित केले आहे.
या दोन दिवशीय अधिवेशनात पंचप्राण पुरस्कार (अर्थव्यवस्थेचे पंचप्राण-शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक व ग्राहक) व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावर्षी कोकण विभागासाठी “ग्राहक” हा पंचप्राण पुरस्कार मिळाला आहे. ग्राहक या पंचप्राण पुरस्कारासाठी “रक्तदान श्रेष्ठ दान, गरजूंना रक्तदान” हे ब्रिद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर कार्य करणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ची निवड झाली आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा