सावंतवाडी / प्रतिनिधी :
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वागतप्रसंगी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच विविध नागरी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सावंतवाडी शहरातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
