कुडाळ सुधार समितीकडून दोन्ही अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
कुडाळ / प्रतिनिधी :
कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विकास बडवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) पदावर राजेश भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात श्री. भागवत व श्री. बडवे यांची कुडाळ सुधार समितीने भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, डॉ. मधुकर सद्वत्ती, विवेक पंडित, महेश ओटवणेकर, राजन माडये, प्रकाश कुंटे, द्वारकानाथ घुर्ये आदी उपस्थित होते.
