You are currently viewing टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 21 ऑगस्ट रोजी डाक पेंशन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 21 ऑगस्ट रोजी डाक पेंशन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 21 ऑगस्ट रोजी डाक पेंशन अदालत

सिंधुदुर्गनगरी

 टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवार, दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी (पिन-416812) येथे डाक पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांनी दिली आहे.

            टपाल विभागातून निवृत्त झालेल्या तसेच सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित आणि तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या तक्रारींचा या पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार आहे.

            मात्र, वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगविषयक प्रकरणे, विभागीय पदोन्नती समिती (डीपीसी) पुनरावलोकनाशी संबंधित प्रकरणे तसेच उत्तराधिकारी व अन्य नीतिगत विषयांशी संबंधित तक्रारींचा या पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

            पेंशनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या, विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी – 416812 या पत्त्यावर दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. 18 ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नसल्याचेही अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा