You are currently viewing तळ सागराचा

तळ सागराचा

कितीही नावं ठेव मला तू,
मी नावाजलेलाच राहीन.
तुझ्याच नाव ठेवण्याने मी,
तुझ्या मुखी गाजलेलाच राहीन.

धावत जरी आलो किनाऱ्यावर,
तरी येताना गर्जतच येईन.
लाटा होऊनी बिखरलो तरी,
ओढ किनाऱ्याकडेच राहील.

अथांग पसरलेला असलो तरी,
तुझी सर्व दुःख पोटात घेईन.
खवळणार नाही गर्भ माझा,
तुला भेटण्या हसतच येईन.

निळाशार अंतरंग माझा,
तुला भेटून येताना गढूळ होतो.
तुझी दुःख पचवताना तो,
स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो.

माझं मन मोठं असलं तरीही,
मनाच्या खोलीला तळ असतोच.
काठी मारूनी ना दुभंगलो तरीही,
मनावर काठीचा वळ उठतोच…
मनावर काठीचा वळ….!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा