You are currently viewing हेल्दी रगडा पॅटीस

हेल्दी रगडा पॅटीस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ. संध्या कुलकर्णी लिखित अप्रतिम पाककृती*

 

*हेल्दी रगडा पॅटीस*

 

सगळेच मस्त रगडा पॅटीस खात असतात.बटाट्याचे पॅटीस त्यामुळे डाएट व शुगर वाल्यांना अगदी मोजून मापून च खावे लागते हो ना..परत रगडा म्हणजे वाटाणे,त्याचा ही पोटाचा काहीना त्रास होतो.म्हणूनच मी आज सर्वांना काहीही त्रास न होता मनसोक्त खाता येईल अशी रेसिपी ट्राय केली.आणि मस्त झाली.. सगळ्यांशी शेअर करावी वाटली म्हणून हे सर्व लिहिण्याचा खटाटोप..

*साहित्य*_: भिजवलेले हिरवे मूग, २_३ बटाटे, बारीक केलेले कोबी आणि गाजर, चाट मसाला,मीठ,गरम मसाला(तुम्हाला आवडेल तो) लाल तिखट,कांदा,टोमॅटो,आले लसूण पेस्ट,कोथिंबीर, बारीक शेव, पुदिना चटणी,चिंच गूळ खजूर चटणी,दही

 

*कृती*_: कुकरमध्ये हि मूग v बटाट्याचे साल काढून तुकडे करून त्यात पाणी,हळद घालून २शिट्ट्या करून घ्या.

*रगडा*… कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या नंतर त्यात आले लसुण पेस्ट टाका. नंतर त्यात टोमॅटो ची पेस्ट टाकून परतावे.नंतर त्यात लाल मिरची पावडर,मसाला हळद,थोडी कोथिंबीर थोडा चाट मसाला घालून छान परतून घ्या. नंतर त्यात शिजवलेले मूग घालून हवे तसे गरम पाणी घालून उकळून घ्यावे.चवीनुसार मीठ घालून वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावे..झाला रगडा तयार..

*पॅटीस*…. बारीक चिरलेला १ वाटी कोबी व गाजर घेणे. साल काढलेले उकडलेले २ बटाटे हे सर्व मिक्स करून त्यात थोडी हळद, मीठ,हिंग, चाट मसाला, गरम मसाला थोडी कोथिंबीर घालून मिक्स केले. हाय रे देवा..पातळ वाटले पॅटीस होईना..काय करू काय करू.. असा विचार करतच होते.मग म्हंटले थोडे जाड पोहे भिजऊन त्यात घालून पाहिले.थोडे ओके झाले पण तरीही समाधान होईना ,की पॅटीस नीट होणार नाहीत.. म्हणून परत सुरू.. कप्पा उघडुन बघू लागले कोणते पीठ त्यात थोडे तरी मिक्स करता येईल का.. बेसन बघत होती माझ्याकडे..म्हंटले नको बाई तू..तू नको म्हणून तर हि मूग आणले ना मी.. ती गेली(बेसन)…😏 नाक मुरडत..नंतर मैदा, कणिक,ज्वारीचे पीठ सगळ्या.. असे करून दमून.. निघून गेल्या.तेवढ्यात कॉर्न फ्लोअर माझ्याकडे वाकून बघताना दिसली. मग काय मी bhok.. करून तिला ह्या वरील मिश्रणात जागा दिली.तर मग वरील पॅटीस चे मिक्स करून पॅटीस करून बघितले तर प्लॅन सक्सेसफुल झाला. मस्त झाले पॅटीस..मग हे पॅटीस थोडे बटर टाकून खमंग परतून घेतले.. hush मस्त झाले..

*आता खाण्याची तयारी*..

एक डिश घेऊन त्यात थोडा रगडा घालायचे.मग त्यात पॅटीस ठेऊन त्यावर रगडा घालून त्यावर पुदिना चटणी, चिंच गूळ चटणी,बारीक कांदा टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला,थोडे दही, बारीक शेव नंतर लाल रंग वाले तिखट घालून सर्व्ह करावे.आणि पोटभर ताव मारणे.

*बटाटा ऐवजी दुधी भोपळाही घेऊ शकता*

*एकदा करून बघा आणि नक्की सांगा कशी वाटली डिश*..

फक्त डाएट आणि शुगर वाल्यानीच करून खावे असे काही नाही हा..

प्रतिक्रिया व्यक्त करा