You are currently viewing रामपुरुष युवा मित्रमंडळाची सामाजिक बांधिलकी; तातडीच्या गरजेसाठी दोन युवकांचे रक्तदान

रामपुरुष युवा मित्रमंडळाची सामाजिक बांधिलकी; तातडीच्या गरजेसाठी दोन युवकांचे रक्तदान

रामपुरुष युवा मित्रमंडळाची सामाजिक बांधिलकी; तातडीच्या गरजेसाठी दोन युवकांचे रक्तदान

समीर परब व योगेश परब यांचा पुढाकार; युवकांना रक्तदानासाठी आवाहन

शिरोडा

रामपुरुष युवा मित्रमंडळ, शिरोडा (परबवाडी) यांच्या पुढाकारातून तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णासाठी दोन युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
४ ऑगस्ट २०२६ रोजी एका रुग्णाला O पॉझिटिव्ह रक्ताची तातडीची आवश्यकता निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच समीर परब आणि योगेश परब यांनी तत्काळ रक्तदान करून रुग्णाला मोलाची मदत केली.
या उपक्रमानिमित्त रामपुरुष युवा मित्रमंडळ, शिरोडा (परबवाडी) यांनी युवकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत मंडळाने समाजोपयोगी कार्याची परंपरा कायम राखली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा