You are currently viewing मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीर 8 ऑगस्टला

मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीर 8 ऑगस्टला

मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीर 8 ऑगस्टला

सिंधुदुर्गनगरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी व एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

            हे शिबिर बाह्यरुग्ण विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत होणार असल्याची महिती शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली.

            या शिबिरामध्ये कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्युरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन (कॅन्सर तज्ञ), युरो सर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, डेन्टल सर्जन, हृदयरोग/मधुमेहरोग तज्ञ, फुफ्फुस रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ तसेच ब्लडप्रेशर, ब्लड शुगर तपासणी, एक्सरे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, हृदयाची टू डी इको तपासणी, ई. सी. जी., प्रयोगशाळा रक्त तपासणी शालेय मुली तपासणी इत्यादी विविध तपासण्या होणार आहेत. तसेच शिबिराच्या ठिकाणी महात्मका ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड, वयवंदना कार्ड, आभा कार्ड सुविधा उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा