You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण संपन्न

दोडामार्ग तालुक्यातील शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण संपन्न

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी संपन्न झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ साहेब तसेच नगरपंचायतचे नगरसेविका श्रीमती ज्योती रमाकांत जाधव , विस्ताराधिकारी श्रीमती दळवी मॅडम तसेच मार्गदर्शक विषयतज्ज्ञ श्री सोनवलकर सर व श्रीमती अर्पिता सावन अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या तसेच प्रशिक्षणार्थी म्हणून दहा केंद्रातील प्रत्येकी दोन याप्रमाणे 20 शिक्षक उपस्थित होते शाळा पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या या अभियानामध्ये इयत्ता पहिलीतील दाखल पात्र मुलांसाठी प्रवेशाच्या अगोदर शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यासंदर्भात सदरचे प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये मुलाचे शारीरिक बौद्धिक सामाजिक व भावनिक तसेच भाषाविषयक व गणन विषयक तयारी पाहण्यासाठी विकास पत्र द्वारे नोंदी करून सहा आठवडे यासंदर्भात कृतिपुस्तिका आयडिया व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत यामधून माता पालक गटांची निर्मिती करून प्रत्येक आठवड्याला मातांचे बैठका होऊन सदरच्या कृती व आयडिया व्हिडिओ करून घेणे व त्या कृती मुलांकडून तयार करून घेणे अशा पद्धतीने पहिल्या मेळावेनंतर ह्या कृती झाल्यावर सदरचा दुसरा शाळा पूर्व मेळावा जूनच्या 30 तारीख पर्यंत घेण्यात येणार आहे त्यामुळे इयत्ता पहिली मध्ये मुलं आनंदाने प्रवेशित होतील हा या मागचा उद्देश आहे याबाबत गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना नियोजनानुसार मातांपालकाचा सहभाग घेऊन सदरचे अभियान पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच उद्घाटन प्रसंगी श्रीमती रमाकांत जाधव नगरसेविका यांनी या अभियानासाठी शिक्षकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले त्यानंतर मार्गदर्शक श्री सोनवलकर सर व सावंत मॅडम यांनी पूर्ण कार्यक्रमाचा नियोजना बाबत मार्गदर्शन करून शाळा पूर्व मेळाव्याचा डेमो दाखवला यामध्ये नंबर एक शाळेचे अंगणवाडीतील मुलांनी व माता पालकांनी सहभाग घेतला तसेच स्मार्ट माता कोरगांवकर यांनी आपले अनुभव कथन केले शिक्षकाने आपले अनुभव कथन केले. गेल्या वर्षी याचवेळी शाळा पूर्वतयारी च्या मेळाव्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेत शाळेमध्ये इयत्ता पहिली मध्ये जास्तीत जास्त मुले दाखल झाली हा या अभियानाचा फायदा आहे म्हणून यावर्षीही याच उत्सवात हा शळापूर्व तयारी अभियान संपन्न होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा