You are currently viewing मॉरिशस आणि भारत

मॉरिशस आणि भारत

*जागतिक साकव्य विकास मंचच्या सन्मा सदस्या तथा अध्यक्षा, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली माजी प्राचार्या कल्पना गवरे लिखित अप्रतिम गीतरचना*

 

*मॉरिशस आणि भारत* 

 

*देशात दोन अपुल्या, संवाद हा असावा*

*मी दूत भारताचा,तू दूत मॉरिशसचा*

*संदेश हाच द्यावा ,संदेश हाच द्यावा*

*देशात दोन अपुल्या संवाद हा असावा*!!१!!

 

*आले दुरून पक्षी, रमले इथे नव्याने*

*ते मायदेश मुकले, झिजले तनामनाने*

*विश्वात त्याग त्यांचा, हा वंदनीय व्हावा*

*देशात दोन अपुल्या, संवाद हा असावा*!!२!!

 

*आला बिहार येथे ,महाराष्ट्रही गरजला*

*एकेक पूर्वजाने,हा मॉरिशस बहरला*

*जोडून प्रेम धागा ,हा मॉरिशस सजावा*

*देशात दोन अपुल्या, संवाद हा असावा*!!३!!

 

*उलटून गेली शतके, पण धर्म सोडला ना*

*छट पूजिला तयांनी, विठ्ठल मनात पुजिला*

*हा भक्तिभाव इथला विश्वात गौरवावा*

*देशात दोन अपुल्या ,संवाद हा असावा*!!४!!

 

*संस्कार भारताचे,रुजले इथे नव्याने*

*हे बंध माणसाने,जपले इथेच न्यारे*

*हा धर्म मानवाचा,विश्वात जागवावा*

*देशात दोन अपुल्या, संवाद हा असावा*!!५!!

 

*प्रा. कल्पना गवरे*

*अध्यक्षा*

*स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली*

*मोबाईल नं.-8108222477*

प्रतिक्रिया व्यक्त करा