*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज लिखित पाककृती*
*गावरान जुंदरी मासवडी*
साहित्य —
दीड वाटी सुके खोबरे
चनापीठ पाव किलो
१०० ग्रॅम तीळ
चार मोठे कांदे
लसुण– चार गड्डे
लाल मिरची पावडर एक चमचा
गरम मसाला १ चमचा
तेल- आपल्या चवीनुसार
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरून दोन चमचा
टेस्ट येण्यासाठी मटण मसाला
फोडणीसाठी — जिरे,मोहरी,हिंग, कढीपत्ता
कृती– प्रथम एक वाटी खोबरं किसून घ्या.अर्धी वाटी खोबरं ऊभे काप करावेत.लसुण सोलून घ्यावा.दोन कांदे उभे चिरावेत मसाल्यासाठी,दोन कांदे बारीक चिरावेत.तीळ भाजून घ्यावेत, खोबरे कांदे
भाजुन घ्यावेत त्यामध्ये थोडी कोथिंबीर,चार पाने कढीपत्ता आले छोटा तुकडा लसुण चारपाच पाकळ्या सर्व थोड्या तेलावर भाजावे.त्यानंतर किसलेले खोबरे भाजून घ्यावे.तीळ भाजावे.बारीक कांदा थोड्या तेलावर भाजावा.कांदा एका भांड्यात काढून तीळ मिक्सरमध्ये एक फेरी घेऊन बंद करावे आणि कांद्याच्या ताटात ओतावे
नंतर लसूण थोडा परतून बारीक होईपर्यंत कुटावा आणि कांदा, खोबरे तिळामध्ये एकत्र करून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, थोडीही हळद घरचा गरम मसाला घालून एकत्र करावे
पुढील कृती- एका पातेल्यात तेल तापवून जिरं मोहरी हिंग हळद यांची फोडणी देऊन त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी ओतुन चवीनुसार मीठ टाकून पाणी उकळून घ्यावे.त्यामध्ये भाजीचे दोन चमचे चनापीठ घालून ढवळावे.पीठ घट्ट झाले की खाली घ्यावे.आणि पोळपाटावर ओला कपडा घेऊन ते पीठ थोडे थापावे आणि त्यावर खोबरे तिळ कांद्याचे मिश्रण टाकून हाताने लांबट वडी थापावी.
रस्सा रेसिपी — एका पातेल्यात दोन पळी तेलाची टाकावी.छोटी तेल घेण्यासाठी असते ती.त्यामध्ये राई तडतड ली की जिरे, हिंग हळद, कढीपत्ता लाल तिखट,गोडा मसाला एकेक चमचा तेलात टाकून त्यावर कांदा खोबऱ्याचे वाटण तेल सुटेपर्यंत हलवावे आणि एक तांब्या पाणी घालून एक छोटा चमचा मीठ टाकून उकळी आणावी झाला आपला मासवडी रस्सा तयार..
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे
