*ज्येष्ठ लेखिका कवयित्री, आदर्श कलाशिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घरकी खुर्ची, सबके बराबर*
अशी असावी आरामदायी प्रत्येक घरी जीवाभावाची खुर्ची
या खुर्चीसाठी हवा तेवढा पैसा
घालावा लागत नाही खर्ची
बाहेरून यावे, खुशाल टाकावे सामान हातातले
प्रेमाने सांभाळते ती सर्वच म्हणून
जिव्हाळ्याने आपले
एकटेच कोपर्यात पडून तिलाही
येतो कन्टाळा
घरातल्या सामानाचा तिला वाटतो
खूप जिव्हाळा
गृहिणी ची सतत धडपड चाललेली
इकडून तिकडे
प्रत्येकाच्या वस्तू घरभरविखुरलेल्या
असतात चोहिकडे
रिकाम्या खुर्चीचे कामच काय, सगळ्यांना तिचा लळा
बाबा कामावरुन येईपर्यंत ती
सर्वाना करते गोळा
कोणी येणार असले की मात्र ती
हॉलमध्ये ऐटीत बसते
झटकन गृहलक्ष्मी घर आवरुन सगळ्या वस्तू आडोशाला लपवते
काय करावे बाईनेतरी, दिवसभर कामे संपता संपत नाहीत
प्रत्येकाला असते घाई, आवरण्यास
कोणी सापडत नाहीत.
वेळेला हाताशी येते खुर्ची धावून
थकला जीव बसतो कोसळून
वर चढायलाही मदत करते, सर्वाना
घेते कुशीत मायेने सांभाळून
अशी हवी सुरेख खुर्ची तिला मायेची प्रेमळ उब हवी
नाही दिखावा मोठेपणाचा, तरी सर्वांना वाटे हवी हवी.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर,
कलाशिक्षिका.
