माणगावातील दोन्ही बाजारपेठा तब्बल पाच दिवस राहणार बंद

 

माणगाव प्रतिनिधी

माणगाव येथील ‘तो ‘ भाजीविक्रेता पॉजिटीव्ह आल्याने आज संध्याकाळपासून माणगाव मधील दोन्ही बाजारपेठा तब्बल पाच दिवस राहणार बंद राहणार असल्याचे माणगाव सरपंच जोसेफ डाॅन्टस यांनी आदेश दिले आहेत. आज संध्याकाळ पासून १३ सप्टेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पर्यंत बंद ठेवण्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. माणगावच्या दोन्ही बाजारपेठा राहणार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. माणगाव तिठा व बाजारातील दुकाने बंद करण्याचे सरपंच जोसेफ डाॅन्टस यांनी आवाहन केले आहे. याशिवाय माणगाव ढोलकरवाडीत कंन्टेनमेंट झोन करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर ग्रामपंचायतची कडक अंमलबजावणी केल्याचे दिसून येत आहे._

प्रतिक्रिया व्यक्त करा