You are currently viewing माऊली…..

माऊली…..

🛕. *माऊली…..* 🛕
🌼🌼🌼🌼

🚩विठ्ठल हा असा एकमेव देव
ज्याच्या हातात शस्त्र नाही,
🚩असा देव ज्याचा अवतार नाही
म्हणून जन्मस्थळ नाही.
🚩जन्मस्थळ नाही म्हणून
पुढल्या कटकटी नाहीत,
वाद, तंटे नाहीत.

🚩असा देव ज्याला
अमुक पद्धतीने पुजलं पाहिजे
असं बंधन नाही,
🚩असा देव ज्याला
_माउली_ म्हटलं जातं.
🚩देव आई असण्याचं
हे उदाहरण दुर्मिळ,
🚩असा देव जो शाप देत नाही,
कोपत नाही,
हाणामारी करत नाही.
🚩कोणतीही विशिष्ट
व्रतवैकल्य नाहीत.
🚩कोणताही विशिष्ट
नैवेद्य नाही.
🚩कोणतीही आवडती
फुले नाहीत.
🚩कोणताही आवडता
पोशाख नाही.

जशी आई आपल्या मुलाचा राग, रुसवा, नाराजी, दुःख सगळं सहन करते तसा _हा विठुराया आपल्या भक्तांचे राग, रुसवा, नाराजी, दुःख सगळं सहन करतो._ म्हणूनच
कदाचित त्याला पुरुष असूनही
*माऊली* म्हणत असावेत…

*🙏जय जय विठ्ठल रखुमाई..🙏*

🙏💐🚩*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!*🚩💐🙏
🌼🌼🌼
*संग्रह @ अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा