दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व स्वामी समर्थ मठ दिगवळे यांच्या वतीने गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये दिगवळे स्वामी समर्थ मठ ट्रस्ट अध्यक्ष लुडबे सर, डॉ. मुंढे सर,प्रकाश वाघ सर, साईकृपा संस्था उपाध्यक्ष शामसुंदर लोट सर,रमेश गावडे सर,साईकृपा संस्था सहसचिव सुनील तांबे सर,राजेंद्र मेस्त्री साईकृपा संस्था सदस्य संदीप शिंगाडे सर, कृष्णा पांगम सर,विठ्ठल शिंगाडे, गीता परब मॅडम, साईकृपा संस्था अध्यक्ष कर्मचारी विशाखा कासले मॅडम,ललित गावडे सर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले.
तसेच रमेश गावडे सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.व शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे राजेंद्र मेस्त्री सर यांनीही खूप बहुमोलाचे मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला आणि दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांच्या पत्नी सौ.अनिता शिंगाडे मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांची आवश्यक साहित्य नोंदणी करण्यात आली. उपस्थित दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला.त्यानंतर स्वामी चरणी आरती व प्रार्थना करण्यात आली.तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांनी स्वामीचरणी भजनरुपी सेवा करून कार्यक्रमाचा आनंद लुटला.त्यानंतर दिगवळे स्वामी समर्थ मठ ट्रस्टच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना महाप्रसाद देण्यात आला.या मेळाव्याला राजेंद्र मेस्त्री आणि कृष्णा पांगम यांचेही खूप बहुमोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वाघ यांनी केले.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
