You are currently viewing मान्सून क्षीण राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी हवामानाचा आंदाज पाहून पेरणी करावी

मान्सून क्षीण राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी हवामानाचा आंदाज पाहून पेरणी करावी

सिंधुदुर्गनगरी

हवामान विभागाच्या आंदाजानुसार पुढील आठवडयात  मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यतील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घ्यावा असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आले आहे.

कृषि विभागामार्फत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आठ दिवसापासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या 22 जून 2021 च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवडयात पश्चिम, मध्य व दक्षिण भारतात  मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पूर्वीच कृषि विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला दिला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =