शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस उत्साहात; सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव
सावंतवाडी :
सह्याद्री पट्ट्यातील तडफदार युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे हे केवळ राजकारणी नसून समाजकारणी आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांनी विविध क्षेत्रांत समाजोपयोगी उपक्रम राबवत गोरगरिबांची सेवा केली असून, या लोकसेवेमुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे भवितव्य उज्ज्वल असून शिवसेना त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.
शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस बुधवारी रात्री आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात संजू परब बोलत होते.
यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, सांगेलीचे माजी उपसरपंच रमाकांत राऊळ, वामन नार्वेकर, आनंद वरक, संजय गावडे, सातुळी-बावळाटचे उपसरपंच स्वप्नील परब, नंदू गावडे, बबन गावडे, यश गावडे, परेश सोंसुरकर, देवरथ राऊळ, सचिन साटेलकर, आंबोलीचे माजी सरपंच जगन्नाथ गावडे, सुनील नार्वेकर, दादा नाटलेकर, आनंद गावडे तसेच शिवसेनेचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे यांनीही दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश गावडे यांनी उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्याच्या बळावर यापुढेही समाजकार्यात अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
