You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेनेचा कणकवलीत काँग्रेसला दणका

बाळासाहेबांची शिवसेनेचा कणकवलीत काँग्रेसला दणका

महिंद्र सावंत, महेश तेली, प्रदीप तळगावकर , डॉ. तुळशीराम रावराणे यांचा प्रवेश

कणकवली

बाळासाहेबांच्या शिवसेनेने कणकवलीत काँग्रेस पक्षाला जोरदार दणका दिला असून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी महिंद्र सावंत यांच्यासह कणकवली शहराध्यक्ष महेश तेली, कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप तळगावकर , डॉ. तुळशीराम रावराणे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षात प्रवेश केला आहे.माजी खास.सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेने ऐन दिवाळीत कणकवलीत राजकीय फटाके फोडले आहेत. कणकवली मध्यवर्ती संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे फोंडाघाट विभागप्रमुख शांताराम उर्फ बाबूराव रावराणे यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी जि प सदस्य संजय आग्रे,माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, शेखर राणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुधीर सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष बुलंद करण्यासाठी मी माझ्या जुन्या सहकाऱ्यांना आवाहन केले होते. त्यानुसार माझे राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ही क्रांतिकारी पक्ष संघटना असून या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सिंधुदुर्गात रोजगार हा महत्वाचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगाची कास धरावी.पुढील वर्षी दिवाळी ला जिल्ह्यात आम्ही निर्माण केलेल्या रोजगाराची आकडेवारी सादर करू असेही सावंत म्हणाले.

पक्षप्रवेशानंतर राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी महिंद्र सावंत म्हणाले की, गेली 25 वर्षे निष्ठेने काँग्रेसचे काम केले. मात्र काँग्रेसकडून एकही लाभाचे पद दिले नाही. तरीही निष्ठेने मी काँग्रेसचे काम केले. माझे राजकीय गुरू माजी खा. सुधीर सावंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. मविआ ची सत्ता येऊनही सिंधुदुर्गात विकास होऊ शकला नाही मात्र मुख्यमंत्री शिंदेंचे नेतृत्व आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल ही धारणा असल्याने मी आज पक्षप्रवेश करत आहे.असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 18 =