You are currently viewing विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत ध्येय निश्चित करून अधिकारी बनावे : दिलीप भालेकर

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत ध्येय निश्चित करून अधिकारी बनावे : दिलीप भालेकर

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत ध्येय निश्चित करून अधिकारी बनावे : दिलीप भालेकर

सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे तालुक्यातील दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर होते.
यावेळी बोलताना दिलीप भालेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले पाहिजे. त्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करून भविष्यात यश संपादन करावे. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याबरोबरच एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी बनावे आणि समाजाचे नाव उंचावावे. समाजाची कौतुकाची थाप कायम तुमच्या पाठीशी राहील.”
कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर फॉरेस्ट ऑफिसर श्रीकृष्ण परीट, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, जिल्हा सचिव अनिल शिवडावकर, सहसचिव गुरुनाथ मडवळ, खजिनदार संदीप बांदेकर, महिला सदस्या सविता कुडाळकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
फॉरेस्ट ऑफिसर श्रीकृष्ण परीट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि त्याचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपला पाया भक्कम करून निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवावे, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी दिपाली भालेकर, अनिल शिवडावकर आणि तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मनोहर रेडकर, लक्ष्मीदास आजगावकर, जितेंद्र मोरजकर, दयानंद रेडकर, प्रदीप भालेकर, भगवान वाडकर, विजय सांगेलकर, तुषार बांदेकर, सदाशिव कुडाळकर, संजय होडावडेकर, प्रवीण मोरजकर, योगेश आरोलकर, लक्ष्मण बांदेकर, सुरेंद्र कासकर, वरुण भालेकर, श्री तीरोडकर, श्री मडवळ, जय भालेकर तसेच महिला भगिनी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन जय भालेकर यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष दयानंद रेडकर यांनी केले.
छायाचित्र ओळ :
सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या गुणगौरव सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, श्रीकृष्ण परीट, दिपाली भालेकर, नागेश कुडाळकर, राजू भालेकर, गुरुनाथ मडवळ, अनिल शिवडावकर, सविता कुडाळकर, देवयानी मडवळ व अन्य मान्यवर.

प्रतिक्रिया व्यक्त करा