You are currently viewing फोंडाघाट एसबीआय शाखेचे व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ गौरव; अजित नाडकर्णी यांच्याकडून अभिनंदन

फोंडाघाट एसबीआय शाखेचे व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ गौरव; अजित नाडकर्णी यांच्याकडून अभिनंदन

फोंडाघाट एसबीआय शाखेचे व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ गौरव; अजित नाडकर्णी यांच्याकडून अभिनंदन

उत्कृष्ट नियोजन, ग्राहकाभिमुख सेवा आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

फोंडाघाट
फोंडाघाट येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेचे व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांना यंदाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘बेस्ट परफॉर्मन्स’ सन्मान प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील शाखेत प्रभावी बँकिंग सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नाडकर्णी यांनी शाखेतील संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली शाखेने उत्कृष्ट नियोजन, तत्पर सेवा आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासल्याने अनेक ग्राहकांनी इतर बँकांतील खाती एसबीआय फोंडाघाट शाखेत स्थलांतरित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखेच्या यशामागे व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांचे प्रभावी नेतृत्व आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे नमूद करत, गुप्ता यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांनी आणखी अनेक वर्षे फोंडाघाट शाखेत कार्यरत राहावे, अशी अपेक्षाही अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा