*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*केशरप्रभात*
केशरमिश्रित आभाळात तळपे
रविबिंब सोनेरी
धूसरशा त्या मंद प्रकाशी दिसे
वनराजी लांबवरी
सृष्टीवर कोमल तेजोयम किरणांची
आभा असे न्यारी
हिरव्या पिवळ्या शेतामधुनी वाट
चालते दूरवरी
ताडमाड स्वागता सूर्यदेवतेस वंदन
करण्या तत्पर
आली घरातजाग,शेतकरीगडबडीने
कामात व्यस्त
कोवळकिरणी,प्रसन्न सकाळ,तरारे
सारे शिवार
गुरेवासरे आनंदे चरण्यात व्यस्त
पपई लगडल्या मस्त.
स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर
कलाशिक्षिका
