*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा.सत्यवान शांताराम घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला घन वनमाळी*
*****************
आषाढ मासे रम्य सकाळी
आला आला घन वनमाळी।।धृ।।
जल अमृत सिंचून सारे
वृक्ष वेलींस केले फवारे
फुलविण्यास कातळ काळी
आला आला घन वनमाळी।।धृ।।१।।
चहू बाजू दाटे हिरवळ
नाले निनादती खळखळ
सुमनांची दाटी रानोमाळी
आला आला घन वनमाळी।।धृ।।२।।
डोलू लागली शिवारं सारी
चालताना पंढरीची वारी
घन वाजवी विठ्ठल टाळी
आला आला घन वनमाळी।।धृ।।३।।
घननिळा तो विठूचा दास
करितो तयारी त्याची खास
धारांच्या रूपे गातो भूपाळी
आला आला घन वनमाळी।।धृ।।४।।
संगे वैष्णव वारीस जाई
भेटण्यास अपुली विठाई
चरण धुळ लावी कपाळी
आला आला घन वनमाळी।।धृ।।५।।
************************************
*रचनाकार:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🌸🌿🌧️🌺🌳🌧️🌾💐🌹☘️🌧️
