You are currently viewing आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत २० जुलैला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत २० जुलैला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत २० जुलैला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

के.एल.ई. विद्यापीठ, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन

सावंतवाडी

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मा. आम. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, शिवसेना सावंतवाडी तसेच के.एल.ई. विद्यापीठ, के.एल.ई. संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, बेलगावी, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) सावंतवाडी, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल), सावंतवाडी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग, श्वसनरोग, पोट व पचनसंस्थेचे विकार, फिजिओथेरपी, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, कर्करोग तपासणी, नेत्ररोग, मूत्ररोग, बालरोग, अस्थिरोग व सांधे प्रत्यारोपण, त्वचारोग, अवयव प्रत्यारोपण मार्गदर्शन, मेंदू व मज्जासंस्था विकार, मधुमेह व संप्रेरक (हार्मोन्स) विकार, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, दंतचिकित्सा, वंध्यत्व (Infertility) व कृत्रिम गर्भरोपण (IVF) यासंदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच गर्भमुख (सर्व्हायकल) कर्करोग तपासणी व मार्गदर्शन अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.
या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी अॅड. सौ. निता सावंत-कविटकर, श्री. खेमराज (बाबू) कुडतरकर, श्री. दुर्गेश (देव्या) सूर्याजी, सौ. यशश्री सौदागर, सौ. भारती मोरे, श्री. गणेशप्रसाद गवस, श्री. दिनेश गावडे, सौ. शर्वरी धारगळकर, श्री. नारायण राणे, श्री. गजानन नाटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा