सावंतवाडी :
बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रमाकांत गावडे यांची नुकतीच राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समितीवर निवड झाली.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत ही निवड करण्यात आली.
डॉ. रमाकांत गावडे हे गोगटे वाळके महाविद्यालयात गेली तीस वर्ष वाणिज्य विभागामध्ये कार्यरत असून करिअर कट्टा या विभागात चार वर्ष सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीन तालुक्याचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. रमाकांत गावडे यांना आतापर्यंत मुंबई विद्यापीठाचा एनएसएस उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
तसेच केंद्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला असून करिअर कट्ट्या मार्फत सलग दोन वर्ष उत्कृष्ट समन्वयक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
