You are currently viewing शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी अशोक दळवी यांची निवड

शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी अशोक दळवी यांची निवड

सावंतवाडी :

 

आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (बाळासाहेबांची शिवसेना) शिंदे गटाकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. यात जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी अशोक दळवी यांच्याकडे देण्यात आली आहे. तर तालुकाप्रमुख नारायण राणे सावंतवाडी, नितीन मांजरेकर वेंगुर्ला व गणेशप्रसाद गवस दोडामार्ग अशी निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. येणाऱ्या निवडणुकात संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी पदाधिकारी असल्यामुळे अधिक अडचणी येत होत्या मात्र आता त्या दूर होणार आहेत.

आता केलेल्या निवडी पुढील प्रमाणे उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जिल्हा संघटक सुनील डूबळे, उपजिल्हा संघटक सचिन देसाई, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, नारायण बर्डे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपजिल्हा संघटक दोडामार्ग दयानंद धाऊसकर, तालुका संघटक दोडामार्ग गोपाळ गवस, तालुका संघटक सावंतवाडी राघोजी सावंत, शहर प्रमुख सावंतवाडी बाबू कुडतडकर, शहरप्रमुख वेंगुर्ला सचिन वालावलकर, शहर प्रमुख दोडामार्ग लवू मिरकर, उपशहर प्रमुख सावंतवाडी सुजित कोरगावकर, उपशहर प्रमुख वेंगुर्ला डॉक्टर राघोजी परब / उमेश येरम

सावंतवाडी मतदारसंघ महिला जिल्हा कार्यकारणी महिला

जिल्हा संघटक ॲड. नीता सावंत – कविटकर, महिला तालुका संघटक सावंतवाडी वैष्णवी केसरकर, संजना सावंत, महिला शहर संघटक सावंतवाडी भारती मोरे, महिला तालुका संघटक वेंगुर्ला प्रतिभा पाटकर, महिला तालुका संघटक सानवी गवस आदींची नियुक्ती करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा