सावंतवाडी :
सावंतवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचे द्वितीय पुत्र समर्थ सीताराम गावडे (वय १६) यांचे बुधवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई संयुक्ता, वडील सीताराम, भाऊ साईश, बहीण तसेच काका, काकी असा मोठा परिवार आहे.
समर्थ गेली पंधरा वर्षे मेंदूच्या गंभीर विकारामुळे अंथरुणावर होता. त्याच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले होते. जन्माच्या तिसऱ्याच दिवशी छोट्या मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तो कायमस्वरूपी अंथरुणाला होता.
बुधवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सावंतवाडी येथील उपरल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
