You are currently viewing मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर , सिंधुदुर्ग आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निमंत्रित

मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर , सिंधुदुर्ग आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना निमंत्रित

वेंगुर्ले

मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर , सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी वेंगुर्लेत सिद्धीविनायक हाॅल मध्ये *स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबीर* आयोजित करण्यात आले आहे .
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून किर्ती महाविद्यालयात , मुंबई चे समाजकार्य अभ्यासक्रमाचे प्रथितयश प्राध्यापक व समन्वयक प्रा. अमेय सुनील महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत . या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते होण्यासाठी मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर , सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष विजय रेडकर व प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी त्यांना निमंत्रित केले व कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची विनंती केली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + fifteen =