You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अष्टाक्षरी रचना*

 

*अध्याय दुसरा*

*(श्री गजानन विजय ग्रंथ)*

 

तळमळ बंकटाची

भेटीसाठी आतुरला

समर्थांनी जाणियले

आले भक्ताच्या घरला ||

 

पितांबर नेसविले

हार सुगंधित गळा

चंदनाच्या पाटावर

बसे समर्थ सावळा ||

 

मस्त थाट पक्वानांचा

उदबत्ती दरवळे

नाम घेता श्रीहरिचे

प्रसन्नता झळाळळे ||

 

बंकटाची सदनिका

भासे दूसरी पंढरी

संकीर्तन निशीदिनी

प्रभुनाम जिव्हेवरी ||

 

भक्त बंकटाचा एक

इच्छाराम भाऊ असे

“श्रींना” नैवेद्य अर्पावा

इच्छा त्याच्या मनी वसे ||

 

इच्छाराम शेटजीने

पदार्थांनी परिपूर्ण

अन्न आणिले वाढून

“श्रींनी” संपविले पूर्ण ||

 

आग्रहाच्या जेवणाने

त्यांना उलटी जाहली

व्यर्थ आग्रह नकोच

शिकवण जगा दिली ||

 

नाल्यातील घाण पाणी

तुंब्यामध्ये स्वच्छ जल

पितांबर चक्रावला

ओळखिले” श्रींचे” बल ||

 

समर्थांची कृती देई

छान संदेश सर्वांना

सार दूज्या अध्यायाचे

ऋण समर्थांचे माना ||

 

 

©️®️

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा