You are currently viewing आडेली गावातील व पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

आडेली गावातील व पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

आडेली गावातील व पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व कृषिरत्न काका चमणकर हायस्कूल आडेली यांच्या वतीने सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये चेअरमन शि.प्र.स.वेतोरे श्री दिगंबर भाई नाईक साहेब, संचालक तथा शालेय समिती अध्यक्ष आडेली हायस्कूल श्री सुरेश धुरी सर, संचालक शि.प्र.स,वेतोरे श्री चंद्रकांत गडेकर सर, सामाजिक कार्यकर्ते भाजपा उपाध्यक्ष श्री बाळू उर्फ प्रसन्ना देसाई साहेब, पंचायत समिती सदस्य आडेली श्री नितीन मांजरेकर सर,सरपंच ग्रामपंचायत वेतोरे पालकरवाडी श्री बंड्या पाटील सर, ग्रामपंचायत सरपंच आडेली सौ.यशस्वी कोंडस्कर मॅडम, आडेली उपसरपंच श्री परेश हळणकर सर, माझी चेअरमन आडेली सोसायटी समीर कुडाळकर सर, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ आडेली हायस्कूल श्री राजेश सामंत सर, उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ श्री विनायक धरणे सर, अध्यक्ष तंटामुक्ती समिती श्री अविनाश तोरस्कर सर, पोलीस पाटील कामकेवीर श्री मांजरेकर सर,साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर कर्मचारी विशाखा कासले मॅडम सौ प्रसन्ना शिर्के मॅडम ललित गावडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कृषिरत्न काका चमनकर हायस्कूल आडेली या शाळेतील विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत पद्य गीत गाऊन आलेल्या सर्व मान्यवर व दिव्यांग बांधवांचे स्वागत केले.हेलन केलर व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभागवार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.व या मेळाव्याचा आपण फायदा करून घ्यावा असे सांगितले. नवनवीन उपक्रम याबाबत मार्गदर्शन केले. व त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे चेअरमन शी.प्र.स.वेतोरे शेती नंबर भाई नाईक साहेब यांनी देखील दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले आणि ते बोलताना असे म्हणाले की तुम्ही मला कधीही हाक मारा मी तुमच्या कायम सोबत असेल आणि जर कुठे काही काम पडत असेल तर तिथे मी सदैव तत्पर राहील याची ग्वाही दिली. आणि दिव्यांग बांधवांना ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ घ्या असे आवाहन केले. तसेच अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ आडेली हायस्कूल राजेश सामंत सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना बहुमलाचे मार्गदर्शन केले.या मेळाव्यामध्ये कृषिरत्न काका चमनकर हायस्कूल आडेली या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना भाजपा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या मेळाव्यामध्ये सत्तर हून जास्त दिव्यांग उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना कृषिरत्न काका चमनकर हायस्कूल यांच्या वतीने उपहाराची व्यवस्था करण्यात आली.उपस्थित दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. संस्था कर्मचारी शिर्के मॅडम यांनी उपस्थित यांचा आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा