१८ जुलैला वेंगुर्ला डेरवण हॉस्पिटल, २० जुलैला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शिबिर; गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रियेचीही सुविधा
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त १८ व २० जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी असून, त्यानिमित्त १८ जुलै रोजी वेंगुर्ला डेरवण हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिर तर २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बेळगाव केइली यांचे शिबिर होणार आहे.
या शिबिरात तपासणीनंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झालेल्या रुग्णांवर संबंधित रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर यांनी नागरिकांनी या दोन्ही आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
