You are currently viewing आगामी निवडणुकीत कॉंग्रेस सर्व जागांवर स्वतंत्र लढेल…

आगामी निवडणुकीत कॉंग्रेस सर्व जागांवर स्वतंत्र लढेल…

– काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

सावंतवाडी
महाविकास आघाडी सरकार जर कॉंग्रेसला जिल्ह्यात किंमत देत नसेल तर आगामी निवडणुकीत कॉंग्रेस सर्व जागांवर स्वतंत्र लढेल असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे आयोजित युवक काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा