You are currently viewing विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, कणकवलीच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश

विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, कणकवलीच्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश

पार्थ पंडित तेली कणकवली तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात चौथा; इस्रो अंतराळ प्रदर्शनासाठीही राज्यस्तरीय निवड

 

कणकवली / प्रतिनिधी :

विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, कणकवलीचा गुणवंत विद्यार्थी कु. पार्थ पंडित तेली याने आपल्या बुद्धिमत्ता, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यार्थ्याचे, पालकांचे, शाळेचे आणि संपूर्ण कणकवली तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

याचबरोबर Diamond Talent Search Examination (DTSE) मध्येही पार्थने उत्कृष्ट कामगिरी करत इस्रो (ISRO) अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षेसाठी राज्यस्तरीय निवड मिळवली आहे. देशातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळणे हा त्याच्या गुणवत्तेचा आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे.

पार्थच्या या दुहेरी यशामागे त्याचा नियमित अभ्यास, जिद्द, चिकाटी, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांचा मोठा वाटा आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून पार्थवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही तो शिक्षण, विज्ञान व संशोधन क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय, कणकवलीचा गुणवंत विद्यार्थी कु. पार्थ पंडित तेली यांचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच इस्रो अंतराळ प्रदर्शनासाठी राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा