You are currently viewing स्वप्न वारी चालण्याचे

स्वप्न वारी चालण्याचे

*श्रीशब्द लालित्य समूह तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🌹स्वप्न वारी चालण्याचे🌹

 

मन व्याकुळ व्याकुळ

माउलीच्या भेटीसाठी

नित्य प्रयत्न प्रयत्न

पंढरीच्या वारीसाठी

 

स्वप्न पहाते पहाते

पायी वारीत चालावे

मुखी नाम विठू विठू

दंग होऊनी नाचावे

 

प्रेमे भजन भजन

गळ्यातून स्वरआर्त

व्हावे तल्लीन तल्लीन

रंध्र रंध्र पुलकित

 

उर दाटतो दाटतो

अष्ट सात्विक भावाने

गोडी नामाची नामाची

लागे वारी चालण्याने.

 

हरि कृपेने कृपेने

भेट व्हावी इच्छा आज

तुज शरण शरण

विसर्जन अहं माज

 

सौ. मंजिरी अनसिंगकर नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा