You are currently viewing आंबोली सैनिक स्कूल मधील “फी”चा प्रश्न तूर्तास मिटला

आंबोली सैनिक स्कूल मधील “फी”चा प्रश्न तूर्तास मिटला

पालकमंत्र्यांसह उद्योजक किरण सामंतांची मध्यस्थी; ऑनलाइन वर्गाची मागणी मान्य

सावंतवाडी

सैनिक स्कूल आंबोली येथील ६वी ते ८वी च्या पालकांनी कोव्हिड च्या परिस्थिती मुळे संस्थेकडे उर्वरित महिन्यांसाठी मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवावे आणि माफक फी घ्यावी अशी मागणी केली होती तर संस्थेने दीड महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण बंद ठेवून पूर्ण फी पैकी १०००० रक्कम कमी करून फी सक्ती पालकांवर केली यामुळे गेली दीड महिना चालेला पालक आणि संस्था चालक यांच्यातील वादावर उद्योजक किरण सामंत यांच्या सहकार्याने आज जिल्हा पालकमंत्री उदय सामंत याच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पडदा पडला आणि संस्थेने पालकांचे म्हणणे मान्य करत सोमवार पासून ऑनलाईन शिक्षण सुरु करत या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची फी ३५०००₹ पर्यंत घेण्याचे मान्य केले.
दरम्यान यावेळी पालकमंत्र्यांन समवेत कुडाळ-मालवण चे आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते.राज्य शासनाने २७ जानेवारी पासून ऑनलाईन /ऑफलाईन चे पर्याय अवलंबत ,पालकांची हमी पत्रे स्वीकारून ,कोव्हिड नियमाचे पालन करत ५वी ते ८वी च्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सैनिक स्कूल आंबोली कडून पालकांनी मुलाना स्कूल मध्ये सोडण्यासाठी आणि पूर्ण फी भरण्यासाठी आग्रही मागणी केली जाऊ लागली .यामध्ये शैक्षणिक संस्थे कडून वेळेत मुलाना न पाठविल्यास आणि फी न भरल्यास कारवाई करण्याची पत्रे हि संस्थे कडून पाठविण्यात आली. मात्र सैनिक स्कूल आंबोली हि निवासी स्कूल असल्याने याठिकाणी राज्याच्या विविध भागातून मुले येत असल्याने या कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची भीती वाटू लागल्याने उर्वरित दोन तीन महिने संस्थेने ऑनलाइन स्कूल चालू ठेवावी आणि मागील वर्षभर आपली मुले स्कूल मध्ये आलीच नसल्याने त्याच्या वर होणारा खर्च वाचला असल्याने ऑनलाईन शिक्षणाची माफक फी आकारावी अशी मागणी संस्थेकडे पालकांनी केली होती.
दरम्यान पालकांच्या या मागणीला संस्था दाद देत नसल्याने पालकांनी अखेर जिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी याना निवेदन देत आमरण उपोषण सुरु केल्यानंतर सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यशस्वी शिष्ठाई करत पालकांना त्याच्या मागण्या संस्थाचालकांची बैठक घेऊन मान्य करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले.मात्र संस्थाचालकांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केलेल्या विनंतीलाही धुडकावून लावल्यानंतर तहसीलदार यांच्या सुचनेंनुसार सर्व पालकांनी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आणि पालकांची मागणी परिस्थिती सांगिल्यावर,पालकमंत्री महोदयांनी ताबडतोब संस्थाचालक आणि पालक याची एक बैठक घेऊन दोघांच्या समनव्याने तोडगा काढत संस्था चालकांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा आणि २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ३५०००रु एवढीच फी आकारण्याचा निर्णय घेण्यास सांगून मागील दीड महिन्यान पासून पालक आणि संस्थाचालक यांच्या मध्ये असणारा वाद दोघांसाठी समाधानकारक निर्णय देऊन मिटवून टाकला.
दरम्यान यावेळी उपस्थित पालकांनी पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक तसेच संदेश पारकर यांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा