You are currently viewing खरे काय खोटे काय?

खरे काय खोटे काय?

*अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी तथा श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक, जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित वास्तववादी काव्यरचना*

 

*खरे काय खोटे काय?*

 

विकासाची गंगा म्हणे

पावसाने वाहून गेली

शृंगारल्या चेहऱ्याची

अशी पोलखोल झाली

 

नैसर्गिक आपत्ती पुढे

गोरगरीब हळहळले

दरड पडून करोडोंचे

बिंग रस्त्यावर फुटले

 

टेक्नॉलॉजीच्या स्पेसने

विकास लिंक मिसिंग

शंकेची पाल चुकचुकते

होती का ओ फिक्सिंग?

 

पहिला थर टेस्टिंग असे

दुसरा देई मजबूत जोड

खोटं बोलायचं पण रेटून

म्होरक्याची आहेच खोड

 

घरोघरी स्मार्ट मिटर

स्मार्ट सेवेत राखू अंतर

आधी जोडू पाहू नंतर

बिल येईलच जादूमंतर

 

नीट टीईटी पेपरफुटी

वाढतो कुणाचा सन्मान?

चूक दाखवी तो गुन्हेगार

राज्याचा होतो अपमान

 

फाटक्याला लावू ठिगळ

नाडा तुटलेल्याचं काय..?

सांभाळून घेतली तरीही

फाटक्यात अडकतो पाय…

 

जे दिसतंय त्यालाच भुलतो

पाचशे हजारात विकत जाय

विकास झाला बॅनर लागले

खरे काय नि खोटे काय..?

 

 

✒️दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा