सिंधुदुर्गात तंबाखू नियंत्रण कायदा व एफसीटीसी 5.3 विषयक एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
कोटपा-2003 कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह तंबाखूमुक्त समाजासाठी विविध विभागांना मार्गदर्शन; तंबाखूविरोधी शपथही देण्यात आली
सिंधुदुर्ग
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरंगी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोटपा-2003 (COTPA) कायदा व एफसीटीसी 5.3 (WHO Framework Convention on Tobacco Control) विषयक एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडभिसे यांच्या मान्यतेने आयोजित या कार्यशाळेस उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीमती प्रतिभा वराळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दावंगे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यशाळेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा-2003 कायद्यातील कलम 4, 6(अ), 6(ब), 5, 7 आणि 8 यांची सविस्तर माहिती दिली. तसेच एफसीटीसी 5.3 अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समित्यांच्या जबाबदाऱ्या आणि तंबाखू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी रवी जाधव व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम तसेच तंबाखूमुक्त शाळा अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर यांनी उपस्थितांना तंबाखूविरोधी शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती कशेळीकर यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे, गणेश उगले, योगेश उगले तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी विशेष सहकार्य केले.
_________________________
*संवाद मीडिया*
*पावसाळ्यात सांधेदुखी, अंगदुखी, पाठदुखी वाढतेय का? 🤕*
*आजच सहभागी व्हा*
*🌧️ मान्सून पंचकर्म महोत्सव*
*माधवबाग कुडाळ क्लिनिक आयोजित 🌿*
*✅ पूर्ण पंचकर्म उपचार*
*(स्नेहन + स्वेदन + बस्ती)*
*💰 फक्त ₹999/- (~₹2000/-)~*
*🎯 पंचकर्माचे फायदे:*
*✔️ सांधे व स्नायूंना आराम*
*✔️ शरीरशुद्धी*
*✔️ वातदोष नियंत्रण*
*✔️ ताणतणाव कमी*
*✔️ शरीर हलके व ताजेतवाने*
*🎁 सोबत मोफत पावसाळी आयुर्वेदिक रेसिपी पुस्तक*
*👥 फक्त 50 व्यक्तींसाठी मर्यादित*
*शिबिर कालावधी: १ जून ते 30 जून*
*📍 माधवबाग कुडाळ क्लिनिक*
*📞 नाव नोंदणीसाठी: 9371621952*
*⏳ जागा मर्यादित आहेत. आजच आपली नोंदणी करा!*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207580/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
