You are currently viewing वियदगंगा

वियदगंगा

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

वियदगंगा
जुलकाफिया

अता जगणे गझलसंगे, उभ्या देहात फिरते ती
असे ती सारखी जवळी, अशी रक्तात भिनते ती

जिथे बघते गझल तेथे, जिथे रमते गझल तेथे
क्षणामध्ये कणामध्ये, पुऱ्या विश्वात दिसते ती

गझलसंगे दिवस रात्री, असे हे राहणे जगणे
जरी कामात असले मी, तरी श्वासात असते ती

मनाच्या आत गझलेने, मिळवलेला असे कब्जा
शिराया फट मुळी नसते, अशी आत्म्यात वसते ती

भिशीला मैत्रिणी जमती, गझल ऐकून त्या रमती
मनामधुनी सहज निघुनी, रसिक हृदयात शिरते ती

उदासी दूर साराया, गझल भारीच धडपडते
मनाचा ताण साराया, सहज प्राणात मुरते ती

अलामत काफिया नखरा, रदिफ वृत्तातला तोरा
नवी नवती खयालांच्या अशा थाटात नटते ती

डॅा.शरयू शहा.

_________________________
*संवाद मीडिया* 

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*

*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*

*• Duration : 4.5 Years*

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*

*पत्ता:*

*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*

*संपर्क:*

*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा