You are currently viewing मन भारावून जाते….!

मन भारावून जाते….!

*काव्यनिनाद साहित्य मंच, पुणेच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.स्वाती गोखले लिखित अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

 

*मन भारावून जाते….!*

 

छोट्याशा गोष्टींनी

मन भारावून जाते

हळवे होते

हल्ली…

 

सुंदर गाण्याची

एखादी सुरेल तान

विसरते भान

जगाचे…

 

वाचन करताना

अध्यात्मिक अनुभव येतो

भारावून नेतो

मनास…

 

हृदयस्पर्शी कथानक

मनाची पकड घेते

भारावून जाते

कायम…

 

छान कविता

जेव्हा लिहायला जमते

भारावून जाते

मन…

 

कुणी केलेल्या

कौतुकाने देखील भारावते

मनोमन सुखावते

कुणीही…

 

प्रतिकूल परिस्थितीत

घरच्यांच्या पाठिंब्याने भारावते

भरून येते

मन….

 

प्रियजनांच्या आठवणीने

मन भारावून जाते

हलके होते

डोळ्यांवाटे…

 

खूप दिवसांनी

जिवलग मैत्रीण भेटली

कळी खुलली

आनंदाने…

 

विषयांच्या वैविध्याने

जेव्हा काव्यांजली सजते

भारावून जाते

मन….

 

सौ.स्वाती गोखले.

पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा