You are currently viewing ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित सामाजिक लेख

ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित सामाजिक लेख

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित सामाजिक लेख*

*परीक्षेच्या उंबरठ्यावर उभे भविष्य*

जून महिना म्हणजे नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी. शाळा-कॉलेजांच्या प्रांगणात पुन्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. नव्या वर्गात प्रवेश, नवीन पुस्तके, नवीन शिक्षक, नवीन मित्र आणि भविष्याची नवी स्वप्ने यांचा हा महिना असतो. याच काळात वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, कृषी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग येतो. या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या ठरतात. लाखो विद्यार्थी अनेक वर्षे अथक परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि मानसिक ताण सहन करत या परीक्षांसाठी स्वतःला झोकून देतात. परंतु अलीकडच्या काळात देशभरात परीक्षा व्यवस्थेभोवती निर्माण झालेला गोंधळ विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्यासाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.

स्पर्धा परीक्षा या गुणवत्तेच्या कसोटीवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणाऱ्या असतात. परंतु जेव्हा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना समोर येतात, परीक्षेचे वेळापत्रक अचानक बदलते, निकालांमध्ये विसंगती आढळते, गुणांकनाबाबत शंका उपस्थित होतात किंवा न्यायालयीन हस्तक्षेपामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडते, तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वास डळमळीत होतो. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करूनही व्यवस्थेतील त्रुटींमुळे मानसिक खचून जातात. काहींचे एक वर्ष वाया जाते, तर काहींची स्वप्ने अधांतरी राहतात. शिक्षणव्यवस्थेतील ही अनिश्चितता कोणत्याही प्रगत राष्ट्रासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.

आजच्या काळात परीक्षा ही केवळ ज्ञानाची चाचणी राहिलेली नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक क्षमतेचीही परीक्षा बनली आहे. स्पर्धा वाढत चालली आहे, कोचिंग संस्कृती विस्तारत आहे, पालकांच्या अपेक्षा उंचावत आहेत आणि समाजातील यशाचे मापदंड केवळ गुणांवर ठरत आहेत. अशा वेळी परीक्षा प्रक्रियेतील अगदी छोटासा गोंधळदेखील विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम करतो. निराशा, अस्वस्थता, नैराश्य आणि भविष्याबद्दलची भीती या भावना वाढू लागतात. शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा असताना, व्यवस्था जर त्यांच्याच मनात असुरक्षितता निर्माण करत असेल, तर हा गंभीर विचार करण्याचा विषय आहे.

आज परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याची आवश्यकता आहे. प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता, मूल्यमापनातील अचूकता, वेळेवर निकाल, तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था आणि दोषींवर कठोर कारवाई या बाबी केवळ घोषणांपुरत्या न राहता प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणारी समुपदेशन व्यवस्था प्रत्येक स्तरावर उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेला संधी देणारी असावी; त्यांच्या सहनशक्तीची शिक्षा ठरणारी नसावी.

सोबतचे चित्र अनेक शब्दांपेक्षा अधिक बोलके आहे. परीक्षा केंद्राबाहेर अश्रूंना वाट मोकळी करून देणारी विद्यार्थिनी, तिच्याभोवती उभे असलेले चिंताग्रस्त विद्यार्थी, पालक आणि पोलीस बंदोबस्त हे दृश्य एका व्यक्तीचे दुःख नसून संपूर्ण शिक्षणव्यवस्थेच्या वेदनेचे प्रतीक आहे. तिच्या डोळ्यांतील अश्रू अपयशाचे नसून व्यवस्थेवरील विश्वास ढासळल्याची वेदना व्यक्त करतात. प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला समान संधी, न्याय्य मूल्यमापन आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया मिळणे हा त्याचा अधिकार आहे; उपकार नाहीत.
भारताला ज्ञानमहासत्ता बनवायचे असेल, तर केवळ अभ्यासक्रम बदलून किंवा नवीन परीक्षा सुरू करून ते साध्य होणार नाही. त्यासाठी परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा विश्वास पुन्हा दृढ करावा लागेल. कारण विद्यार्थ्यांची स्वप्ने ही कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती असतात. त्या स्वप्नांचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था हीच उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी ठरेल. त्यासाठी जेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू नव्हे, तर आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची चमक दिसेल तेव्हाच खरी परीक्षा यशस्वी ठरेल.

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*

*👇अभ्यासक्रम*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture

प्रवेश क्षमता- 180

*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*

www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture

प्रवेश क्षमता- 60

*संपर्क : 8600879426 7588868705*

www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)

प्रवेश क्षमता- 80

*संपर्क: 9421154594 7588868705*

www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*

https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/

https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा