You are currently viewing 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांसाठी रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांसाठी रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

*15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांसाठी रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न*

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर उपाध्यक्ष शामसुंदर लोट सर सहसचिव सुनील तांबे सर,बाबुराव गावडे,सविता गावडे ,आशिष गावडे, कर्मचारी विशाखा कासले,आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या विविध संधी, शासकीय योजना, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाकरिता २०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आवश्यक माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
दिव्यांग बांधवांनी स्वावलंबी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या शिबिरामध्ये 30 हून जास्त दिव्यांग उपस्थितीत होते.
या शिबिरास दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार, व्यवसाय व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा