You are currently viewing युवा पिढीने आपली जीवनशैली बदलणे काळाची गरज… जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर

युवा पिढीने आपली जीवनशैली बदलणे काळाची गरज… जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर

युवा पिढीने आपली जीवनशैली बदलणे काळाची गरज…
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त ) येथे सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले हे होते. व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे
कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले,संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक ॲड.शामराव सावंत,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल, संस्थानप्रेमी नागरिक श्री अण्णा केसरकर,प्रा.अन्वर खान,मधुकर देसाई, सुमन गावडे,यशवंत देसाई, मंगेश तळवणेकर, विकास नाईक, संजय लाड, सदासेन सावंत, प्रमोद सावंत, रेश्मा सावंत, काका मांजरेकर, प्रा . दिलीप गोडकर, प्रा.एस एस पाटील,डॉ. पी पी सावंत, पत्रकार विजय देसाई,महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी – व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले.
त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा.माधव भिसे यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा जीवन परिचय करून दिला. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी सावंतवाडी संस्थान परिसरामध्ये शिक्षण,आरोग्य,रस्ते अशा विविध सोयी सुविधा निर्माण केल्या. महात्मा गांधीजींनी त्यांना रामराजा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना न्यायनितीज्ञ राजा असे संबोधले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या खेमराजीय या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
त्याचबरोबर बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यामध्ये बारावी कला शाखेमधून मधुरा मिलिंद सावंत ८३ % मिळून प्रथम क्रमांक,मिताली संदीप फोंडेकर 80% व आयुष्य अमित देसाई 73% द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेमधून मृणाली दिलीप कालेलकर 80%, दीक्षा दिवाकर सावंत 71 % व श्रुती रवींद्र गावडे 70 % गुण मिळवून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. बारावी विज्ञान मध्ये शिवम अनिल मगदूम 84% अमोल दिगंबर दळवी 81 % व हुझैफा फारुक शहा 79 % गुण मिळवून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. गायत्री वराडकर हिने भूगोल विषयात 96 मार्क्स मिळवल्याबद्दल तिचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी सांगितले की आज स्पर्धेचे युग आहे. हीच स्पर्धा आज जीवघेणी ठरत आहे.सोशल मीडियाचा प्रचंड परिणाम आजच्या युवा पिढीवरती होत आहे.
कालचे तंत्रज्ञान आज जुने होत आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुणाने स्वतःचे करिअर करणं त्याचबरोबर सोशल मीडियापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक तरुणाचा रोजचा जास्त वेळ हा सोशल मीडियावर व्हाट्सअप, इन्स्टा, युट्युब,फेसबुक यावर जातो. मोबाईल मुळे त्यावर येणारे रिल्स बघून आजची पिढी आभासी जगात वावरत आहे. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे.आज तरुणांजवळ पुस्तक वाचायला वेळ नाही.आभासी जग व वास्तविक जग यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. आभासी जगात वावरल्याने नाती तुटत जातात, तरुणांमध्ये अवास्तव अपेक्षा निर्माण होतात,यासोबतच आजची तरुण पिढी अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये आघाडीवर आहे, अंमली पदार्थ हे विष आहेत व विषाची परीक्षा घ्यायला नको हे आजच्या पिढीला सांगणे गरजेचे आहे, जीवन आहे म्हणजे आशा आहे,संधी आहे, आपले चरित्र,शिस्त, स्फूर्ती,चैतन्य याचा पाया घेऊन विद्यार्थ्यांनो आपण बाहेर जा,आपल्याला उत्तुंग यश मिळेल याची खात्री आहे.गुरुजनानी आपल्याला हाच वसा दिला आहे.असे ते म्हणाले मन लावून अभ्यास करा व यशस्वी व्हा अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत भोंसले यांनी प्रमुख अतिथी डॉ.मोहन दहीकर यांना धन्यवाद दिले की त्यांनी आजच्या तरुण पिढीला उत्तम मार्गदर्शन केले. बापूसाहेब महाराजांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने आपल्यासमोर ठेवावा.बापूसाहेब महाराजांनी अल्पकाळामध्ये सावंतवाडी संस्थांनचा जो विकास केला त्याच्या खुणा आज संपूर्ण संस्थान मध्ये दिसत आहेत. त्यांचा दूरदर्शीपणा हा संस्थांनच्या प्रगतीमध्ये मोलाचा ठरला आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ पूनम सावंत यांनी केले व आभार प्रा. यु. आर. पवार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा