मुलुंड आगार सार्वजनिक कामगार समितीच्यावतीने सेवानिवृत्ताना सन्मानित
मुंबई(प्रतिनिधी )
आजच्या दिवशी जे बसवाहक, चालक त्यांच्या सोबत वरिष्ठ वहातूक अधिकारी असे अकराजणांनी स्वतःला झोकून देऊन काम पाहिले ते पाहता तुम्ही आमचा पाया आहात. श्री. बाळकृष्ण चौधरी यांनी नमूद केल्याप्रमाणे कोरोना काळात सर्व वहातूक व्यवस्था कोलमडून पडली. त्यावेळी माझा कर्मचारी वर्ग धाडसीवृत्ती योध्दा सारखा लढा यांची बेस्ट प्रशासनाला जाण आणि जाणीव आहे. म्हणूनचं तुम्ही स्वतःला कमी लेकू नका असे मुलुंड आगार अधिकारी दिनेश चिंतामणी फलके यांनी सार्वजनिक सत्कार समितीने आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रतिपादन केले. प्रारंभी बसवाहक हरिश्चंद्र कुबल, दिलीपकुमार तरटे, दिलीप बोडके, उल्हास काळे, सुभाष पाटील, जयसिंग यादव, चंदकांत सस्ते, भास्कर पाटील, सदाचार वाघमारे, आणि वरिष्ठ वहातूक अधिकारी नामदेव महाले आदींना शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह प्रदान करून श्री. दिनेश चिंतामणी फलके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रारंभी मुलुंड आगार व्यवस्थापक अर्जुन मांजरेकर यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती सर्वश्री श्री. उल्हास काळे, जयसिंग यादव, हरिश्चंद्र कुबल सत्काराला उत्तर देताना सांगितले की,आम्हाला वरिष्ठांनी सांभाळून घेतलं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देतो. तसेच आमच्याकडून प्रसंगी काही अपशब्द बोललं गेल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे सांगितले. यावेळी घाटकोपर विभागाचे व्यवस्थापक बाळकृष्ण चौधरी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विषद केले की, या आगारातून काम केल्यानं बसवाहक, चालक यांच्याशी ऋणानुबंध जुळले ते आजही कायम आहेत. पुढील वाटचालीस माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. सार्वजनिक कामगार समितीचे अध्यक्ष आबासाहेब साळुंखे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, आम्ही प्रतिवर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करतो. याप्रसंगी सचिव रामचंद्र खोत, खजिनदार सुरेश लोहकरे यांनी समारंभ यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. रंगतदार समारंभाचे सूत्रसंचालन अतुल दुर्गाडे यांनी अतिशय मौलिक शब्दात केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी वर्गाचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार उपस्थित होते.
