You are currently viewing कुडाळ तालुक्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा व्यापक स्तरावर शुभारंभ

कुडाळ तालुक्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा व्यापक स्तरावर शुभारंभ

कुडाळ तालुक्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा व्यापक स्तरावर शुभारंभ

* तहसीलदार व संबंधित बी.एल.ओ. यांच्या सातत्यपूर्ण प्रशासकीय प्रयत्नांना यश

*चेंदवण येथे सरपंचांना पहिला प्रगणक अर्ज सुपूर्द करत प्रक्रियेची अधिकृत सुरुवात

सिंधुदुर्गनगरी

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 269-कुडाळ विधानसभा मतदार संघात आज दिनांक 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 कार्यान्वित करण्यात आला आहे.  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली, तसेच कुडाळ तालुक्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांच्या गतिमान नियोजनाखाली मतदार याद्या अधिक अचूक व अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

             विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ दि. 30 जून 2026 झाला असून ई. एफ. चे वितरण दिनांक 29 जुलै 2026 या कालावधीत पर्यंत करण्यात येतील. यादरम्यान सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) घरोघरी जाऊन गणक अर्जाचे (Enumeration Forms) वाटप व पडताळणी करत आहेत. चंदवण ग्रामपंचायत क्षेत्रात या कामाची औपचारिक सुरुवात झाली असून, तेथील बी.एल.ओ. बी. डी. नेरकर यांनी गावचे प्रथम नागरिक वैभव चेंदवणकर यांना तालुक्याचा पहिला मानाचा प्रगणक अर्ज सुपूर्द केला आहे. चेंदवणमधील या यशस्वी सुरुवातीच्या धर्तीवर संपूर्ण तालुक्यात हे क्षेत्रीय काम केले जात आहे.

               या मोहिमेच्या पुढील टप्प्यात दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी ‘प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा नावे वगळण्यासाठी नागरिक दि. 5 ऑगस्ट 2026 ते दि. 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत आपले दावे व हरकती नोंदवू शकतील. प्राप्त अर्जाची कायदेशीर पडताळणी करून प्रशासन दिनांक 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत त्यांची अंतिम विल्हेवाट लावेल आणि अखेर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांनी व नवमतदारांनी या विहित मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार  यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा