You are currently viewing नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्राला पुन्हा अच्छे दिन : प्रभाकर सावंत

नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्राला पुन्हा अच्छे दिन : प्रभाकर सावंत

नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्राला पुन्हा अच्छे दिन : प्रभाकर सावंत

भाजप किसान मोर्चातर्फे वेंगुर्ल्यात प्राकृतिक शेती संमेलन; प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांचा ‘शेतकरी फेलो’ पुरस्काराबद्दल सत्कार

वेंगुर्ला :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत अनेक समाजाभिमुख योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे देशाच्या सर्वच क्षेत्रात सकारात्मक बदल घडले आहेत. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेऊन मोदी यांनी नैसर्गिक शेतीचा पर्याय पुढे आणला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कृषी व पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना मिळत असून, पुढील पाच ते दहा वर्षांत शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने मोदी सरकारच्या बारा वर्षपूर्तीनिमित्त मंगळवारी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्राकृतिक (नैसर्गिक) शेती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी किसान मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत, जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, फळबाग तज्ज्ञ डॉ. रणजीत देव्हारे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. सागर मोरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू (पप्पू) परब, पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, आत्मा समिती अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, नगरपरिषद उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, खरेदी-विक्री संघ संचालक वसंत तांडेल, प्रज्ञा परब, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे प्रमुख बाळकृष्ण गावडे, नागपूर येथील जैविक शेतकरी चंद्रशेखर पारखी यांच्यासह तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, सरपंच आणि भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आरवली येथील प्रगतशील शेतकरी सचिन दळवी यांना ‘शेतकरी फेलो’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रभाकर सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी, तर आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा